
Rommy Torrico ची कला, rommytorrico.com
अभ्यासाबद्दल
अवर हेल्थ मॅटर्स (आमच्या आरोग्याचा मुद्दा): भारतीय ट्रान्स मेन आणि ट्रान्समस्क्युलिन हेल्थ स्टडी हा समुदाय-आधारित संशोधन प्रकल्प आहे. अभ्यासाचे नेतृत्व ट्रान्समस्क्युलिन संचालन समिती आणि ड्रेक्सेल विद्यापीठ (फिलाडेल्फिया, यूएसए) आणि लोकसंख्या परिषद (नवी दिल्ली) मधील संशोधक (ट्रान्स आणि नॉन-ट्रान्स) करतात. प्रकल्प भागीदारांमध्ये “ट्विट फॉउंडेशन” आणि “ट्रान्समन कॉलेक्टिव्ह” यांचा समावेश आहे.
अवर हेल्थ मॅटर्स, समाज आणि आरोग्य सेवेमधील ट्रान्समस्क्युलिन लोकांच्या अनुभवांवर आणि ते आपल्या आरोग्यावर आणि आरोग्य हितावर कसा परिणाम करतात यावर लक्ष केंद्रित करते. अभ्यासाचे निष्कर्ष/परिणाम समुदायाबरोबर परत सामायिक केले जातील आणि भारतातील ट्रान्स पुरुषांसाठी व ट्रान्समस्क्युलिन व्यक्तीना आरोग्य सेवा आणि अधिक पुष्टी देणार्या धोरणांमध्ये अधिक चांगल्या प्रवेशासाठी समर्थन करण्यासाठी वापर केला जाईल.
2021 मध्ये आमच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी, आम्ही ट्रान्स मेन आणि ट्रान्स मॅस्क्युलिन लोकांच्या त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकण्यासाठी 40 सखोल मुलाखती घेतल्या. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत, आम्ही 300 हून अधिक सहभागींच्या अनुभवांवर परिमाणात्मक (संख्यात्मक) डेटा गोळा करण्यासाठी एक सर्वेक्षण केले. सर्वेक्षण ऑनलाइन आणि निवडक शहरांमध्ये ट्रान्स रिसर्च कर्मचार्यांसह वैयक्तिकरित्या उपलब्ध होते. मुख्य सर्वेक्षण अहवाल आता येथे उपलब्ध आहे. आम्ही येथे अतिरिक्त अभ्यास परिणाम सामायिक करू – लवकरच आम्हाला पुन्हा भेट द्या!